
मैत्री चषक तायक्वांदो स्पर्धेत जेएसटीएआरसीचे घवघवीत यश
By pWW@101 In News On April 16, 2016
मुंबई येथील वेदांत तायक्वांदो अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या ५ व्या मैत्री चषक स्पर्धेत कोल्हापुरातील जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग अंड रिसर्च सेंटर(जेएसटीएआरसी) ने ८ सुवर्णपदक,८ रौप्यपदक आणि ३ कास्यपदक मिळवत घवघवीत यश संपादन केले.दिनांक १४ एप्रिल रोजी मुंबई अंधेरी येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई,पुणे,नाशिक,कराड आणि कोल्हापूर येथून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. जेएसटीएआरसीने स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.यशस्वी खेळाडूंमध्ये ध्येय वसा,मानस चौगुले,रोहीत खुडे, ऋषिकेश ईटगी,सुरज रजपूत,अक्षता सावंत,वैष्णवी देशपांडे,यश्वी वसा यांनी सुवर्णपदक संपादन केले.
महमदसाद मोमीन,स्वप्नील देशमाने,सलील कुलकर्णी,पृथ्वीराज अवघडे,शाश्वत पाटील,साहिल दळवी,अमित भारतवाज,विवेक माजगावकर यांनी रौप्यपदक मिळविले.तर सुवन पोवार,भावेश चौधरी,आणि राजलक्ष्मी अवघडे यांनी कास्यपदक पटकावले.
या सर्व खेळाडू स्पर्धकांना प्रशिक्षक अमोल भोसले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.तसेच जेएसटीएआरसीचे प्रमुख निलेश जालनावाला आणि पालकवर्ग यांचे प्रोत्साहन मिळाले.गेली अनेक वर्षे या अकादमीने तायक्वांदो क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.स्वसंरक्षणाचे धडे इथे दिले जातात त्याचप्रमाणे मुलामुलींमधील आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती अशा स्पर्धांमुळे वाढते.हाच प्रयत्न या अकादमीच्या वतीने नेहमी केला जातो.